आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

0

वासिंद । आर. एल. चेस् कोचिंग अ‍ॅकेडमीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक व चेस् मास्टर रुपेश बोराडे यांच्यामार्फत न्यू. आयडियल स्कूल (वासिंद) येथे घेण्यात आलेला बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून एकूण 57 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. स्वीच लीग पद्धतीने खेळलेल्या स्पर्धेत तालुक्यातून अनेक विद्यार्थ्यांनी गुणांक मिळवून चुणूक दाखवलेली आहे. सदर कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार विजेते, आदर्श शिक्षक, माजी प्राचार्य एस. पी. वाव्हाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत ग्रुप 1 मध्ये (प्रथम) अपूर्व वाकचौरे (2री),(द्वितीय) राजेश कातकडे (2री),(तृतीय) पुष्पराज निकाळे (2री), ग्रुप 2 मध्ये (प्रथम) हर्षित बोराडे (3री),(द्वितीय)चिराग शेलार (5वी),(तृतीय) मैत्रेयी निकाळे (5वी),(चतुर्थ) अक्षयानी मेदुरी (4थी), गट क्र. 3 (6वी ते 8वी) मध्ये (प्रथम) देवेश पाटील (6वी),(द्वितीय) सार्थक चव्हाण (7वी), (तृतीय) प्रतीक सुरळकर (7वी),(चतुर्थ) रोहिदास गोतारणे (8वी), गट क्र.4 (9वी व 10वी) मध्ये (प्रथम) अमित वीर (9वी),(द्वितीय) हेरंब बढे (9वी),(तृतीय) सिद्धेश्‍वर लच्याणे (9वी),(चतुर्थ) आकाश गावीत (10वी) तसेच गट क्र.5 मध्ये (प्रथम) तेजस बोराडे (11वी),(द्वितीय) निशांत तांडेल (12वी), (तृतीय) कुणाल सोनावणे (12वी) इत्यादी शिलेदारांनी विजयाची बाजी मारली. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.

या शाळांनी घेतला सहभाग
वासिंदमधील न्यू आयडियल स्कूल 4, जिंदल विद्यामंदिर 5, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल 1, सरस्वती विद्यालय 1 तसेच ग. वि. खाडे विद्यालय शहापूर 1, एकलव्य रेसिडेन्सी स्कूल सावरोली 1, संत ज्ञानेश्‍वर विद्यामंदिर टहारपूर 1, नूतन ज्युनि. कॉलेज आसनगाव 1, माध्यमिक विद्यालय आसनगाव 1, एस. एम. मुथा कॉलेज कल्याण 1 आणि पेंढारकर कॉलेज डोंबिवलीमधील 1 मुलगा आहे. स्पर्धेमध्ये पंच म्हणून मुकेश दामोदरे, संदीप वाकचौरे, रुक्षराज कातकडे, दीपक सुतार, श्याम शेलार, कुणाल राऊत, प्रभाकर शिंदे यांनी जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेकांचा ट्रॉफी,प्रमाणपत्राचे वितरण
सदर कार्यक्रमात आयोजक व प्रशिक्षक रुपेश बोराडे (संस्थापक आर. एल. चेस. कोचिंग अ‍ॅकेडमी, वासिंद), लक्ष्मण पवार (सामाजिक कार्यकर्ते), मुरलीधर सोनवणे ( ज्येेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते), योगिता बोराडे (बुद्धिबळ प्रशिक्षक), सारिका पवार (सामाजिक कार्यकर्त्या) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.