आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेंत प्रशांत कोळी यांना सुवर्ण पदक

0

धनाजी नाना महाविद्यालयाचा विद्यार्थी
जळगाव । अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला सुवर्ण व कास्य पदक प्राप्त करुन देणार्‍या खेळाडूंचा सत्कार कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कालीकत विद्यापीठ, कालीकत (केरळ) येथे झालेल्या स्पर्धेत विद्यापीठाकडून खेळताना 55 किलो वजन गटात प्रशांत केाळी (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) या विद्यार्थ्यांने सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच 61 किलो वजन गटात गोविंदा महाजन (श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर) याने कास्य पदक प्राप्त केले. विशेष बाब म्हणजे प्रशांत कोळी याला शौक्षणिक वर्ष 2018-19 चा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झाला. या स्पर्धेत एकूण 934 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या विशेष नौपुण्याबद्दल व यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच संघ प्रशिक्षक डॉ.गोविंद मारतळे व संघ व्यवस्थापक डॉ.मुकेश पवार यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील, प्रा.किशोर पाठक, ललित काटकर उपस्थित होते.