आंदोलनात मृत्यू झालेल्या नागरिकांविषयी योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त विधान !

0

नवी दिल्ली: उत्तरप्रदेश मध्ये गेल्यावर्षी नागरिकता संशोधन कायदा विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होती. या आंदोलनादरम्यान हिंसा घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे उत्तरप्रदेश सरकार विरोधी पक्षांनी टीका केली होती. आंदोलनात मृत्यू झालेल्या लोकांविषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जर कोणी मरण्यासाठी येत असेल तर तो जिवंत कसा राहिल, असं योगी म्हणाले.

आंदोनात ठार झालेल्यापैकी कोणीही पोलिसांच्या गोळीने मरण पावले नाही. मृत सर्वजण हिंसा घडविणाऱ्यांच्या गोळीने मृत्यूमुखी पडले आहेत. जर कोणी लोकांना ठार करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरत असेल तर तो मरतो किंवा पोलीस कर्मचारी मरतो, असं योगींनी सांगितले होते. या वरून पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान मुख्यमंत्री योगींनी नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ लखनौ, कानपूर आणि प्रायगराज येथे आंदोलन करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी आजादीचे नारे लावले जात आहेत. काय आहे आजादी, आपल्याला जीनांच्या स्वप्नासाठी काम करायचे की, गांधीजींच्या ? असा सवाल योगींनी उपस्थित केला. तसेच डिसेंबरमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवं, असही योगींनी म्हटले.