आंबेडकर-ओवेसी युती ही भाजपाची बी टीम!

0
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप
मुंबई – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची युती ही भारतीय जनता पार्टीची ‘बी टीम’ आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.
भाजपाला रामराम ठोकणारे आमदार आशिष देशमुख यांच्याप्रमाणे इतर प्रमुख पक्षातील अनेक नाराज आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत. सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत असून हळूहळू ते तुम्हाला दिसेल, असेही ते म्हणाले. भाजपने शिवसेनेत गळ टाकला आहे आणि 18-20 आमदार गळाला लागले आहे, असे म्हटले जात आहे. पण शिवसेनेला तडा जाऊच शकत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना अभंग आणि मजबूत आहे. ज्यांनी या बातम्या पसरवल्या त्यांचेच आमदार, खासदार आज सोडून जात आहेत. त्यांच्याच पक्षात अस्वस्थता आहे, असेही राऊत म्हणाले.