रावेर । वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटण्याचे नाव घेत नाही. त्यातही मध्य प्रदेशातील बर्हाणपूरच्या बसेस रावेरातील डॉ.आंबेडकर चौकात तासन्तास उभ्या राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे या परिसरातून वाहनधारकांना वाहने चालवितांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावर नियंत्रणासाठी कारवाई गरजेची आहे. रावेर शहरात सर्व दिशांनी प्रवेश करणार्या वाहनांना डॉ.आंबेडकर चौकात दाखल व्हावे लागते. येथून दुसरे मार्ग लागतात. परिणामी डॉ.आंबेडकर चौक नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो. या वर्दळीच्या रस्त्यावर मध्य प्रदेशातील बर्हाणपूरकडून येणार्या बसेस तासन्तास भर रस्त्यात उभ्या केल्या जातात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. सध्या मेन रोडवर रस्ता दुरुस्ती सुरू असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ऐकरी मार्गाने करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबादेखील होतो.
याविषयी वारंवार ओरड होत असली तरी बर्हाणपूर येथील बसचालकांची मुजोरी सामान्यांसाठी डोकेदुखी ठरते. विशेष म्हणजे डॉ. आंबेडकर चौकात वाहतूक शाखेचा पॉइंट आहे. येथे कर्तव्य बजावणार्या कर्मचार्यांनी नियमित कारवाई ही अडचण दूर होईल. बर्हाणपूरच्या बसेस रावेर शहरात रस्त्यावर कुठेही उभ्या राहतात.