आंबेनळी घाटात अपघात; फरशी घेऊन जाणारा ट्रक कोसळला

0

सातारा-पोलादपूरहून फरशी घेऊन जाणारा ट्रक आंबेनळी घाटात कोसळला. आज सकाळी ही घटना घडली. ट्रकमध्ये चालकासह सहप्रवासी असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने आंबेनळी घाटाकडे धाव घेतली आहे.

मागील वर्षी याच घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला झालेल्या अपघातात ३३ जण ठार झाले होते.