आईवडीलांमुळे प्रेरणा मिळत असून त्यांना प्रत्येकाने आयुष्यभर सांभाळावे

0

एरंडोल : दान चार प्रकारचे असतात स्वतःसाठी मागतात ती भिक असते. कुटुंबासाठी मागतात ती भिक्षा असते, समाजासाठी मागतात ते दान असते तर विश्वासाठी जे मागतात ते पसायदान असते असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी केले. आर्यन फाउंडेशन, दीपस्तंभ फाउंडेशन, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिन दिवशीय व्याख्यान मालेत आनंदी कुटुंबासाठी या विषयावर ते बोलत होते. खासदार ए.टी. पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, बजाज पगारिया आटोचे संचालक पुखराज पगारिया, पोलीस उपाधीक्षक संतोष गायकवाड, प्राचार्य आर.बी.पाटील, प्रमुख पाहुणे होते. यावेळी दादासाहेब पाटील महाविद्यालयातील निवृत्त ग्रंथपाल सुधाकर काळे यांचा सत्कार करण्यात आला.

सद्यस्थितीत कामाच्या व्यापामुळे सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी सायंकाळी घरी जाण्याच्या चांगल्या मनस्थितीत नसतात. सर्व गरजवंतांना दानशुर व्यक्तींनी आनंदाने मदत करावी असे आवाहन केले.मनातले वाईट विचार संपले की चांगुलपणाकडे मन वळत असते. मन शुध्द असेल तर चांगल्या कामाकडे आपोआप मनुष्य वळत असतो. विद्यार्थ्यांनी चांगली संगत गुण ठेवणे गरजेचे आहे. संतांचे बोल अमृत असते.त्यांचे बोल हृदयाचे परिवर्तन करीत असते. चांगल्या विचारानेच माणूस बदलत असतो. परिवार, कुटुंब व सहकारी यांच्यात चांगले नाते निर्माण झाले तर संपूर्ण वाद संपुन जातील व सर्वत्र शांतता निर्माण होईल असे सांगितले. रक्ताचे नाते चांगले असले तर संपूर्ण जग सुखी होईल. माणसांबरोबरच जनावर देखील आपल्या पुढील पिढीसाठी जगत असतात त्यामुळे सर्वांनी पुढील पिढी आदर्श निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी खासदार ए.टी. पाटील उद्योजक पुखराज पगारिया यांनी दीपस्तंभच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या सामाजिक उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

दान मागण्याचे प्रकारावर टाकला प्रकाश
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी आई व बहिण यांनी बनविलेले जेवण केल्यानंतर कोणीही बाहेर हॉटेलमध्ये जात नाही. अशी चव त्यांच्या हाताला असल्याचे सांगितले. आई व वडील यांच्यामुळे आयुष्यात प्रेरणा मिळत असून त्यांना प्रत्येकाने आयुष्यभर सांभाळावे असे आवाहन केले. दान चार प्रकारचे असतात स्वतःसाठी मागतात ती भिक असते, कुटुंबासाठी मागतात ती भिक्षा असते,समाजासाठी मागतात ते दान असते तर विश्वासाठी जे मागतात ते पसायदान असते असे सांगितले.

कार्यक्रमांचे आयोजन
दीपस्तंभचे संचालक प्रा.यजुवेन्द्र महाजन यांनी प्रास्ताविक केले. कनिष्का विसपुते या विद्यार्थिनीने सूत्रसंचलन केले. दीपस्तंभ व्याख्यान मालेचे संपूर्ण नियोजन विद्यार्थी व विद्यार्थिनीनी अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, नगरसेविका जयश्री पाटील, भाजपचे शहराध्यक्ष निलेश परदेशी, अमोल जाधव, प्रशांत महाजन, सचिन वसपुते, प्रा.आर.डी.पाटील, नरेश डागा, बी.के.धूत, प्रा.गौरव महाजन याचेसह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.