आईशी रात्री झाला वाद अन् तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती खालावल्याने तरुणाला डॉक्टरांनी औषधांसोबत काही पथ्य पाळण्यास सांगितले होते. मात्र तरुणपथ्य पाळले नसल्याने आई बोलल्याने रात्री वाद झाला. यातून दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी 3.30 वाजता तरुणाने लेंडी नाल्याजवळ रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. परेश बापू मराठे (वय 22 रा. चौघुले प्लॉट) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शहरातील जुने जळगाव भागातील चौघुले प्लॉट परिसरातील परेश बापु मराठे यांच्यावर दोन तीन महिन्यांपूर्वीं त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. दरम्यान, उपचारानंतर त्याला पथ्थ पाळण्यास सांगण्यात आले होते. मात्र तो डॉक्टरांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत होता. यावरुन 24 रोजी रात्री आई बोलल्याने वाद झाला.

परिसरातील नागरिकांनी पटविली ओळख
25 रोजी परेश हा कामावर जातो असे सांगून घरातून निघाला त्याने दुपारी 3:30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनपासून काही अंतरवर असलेल्या लेंडी नाला पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. प्रकार लक्षात आल्यावर परिसरातील घटनास्थळी नागरिकांनी गर्दी झाली. किरण मराठे यांनी मयत हा परेश असल्याचे सांगितले. किरण मराठे मनोज अटवाल, अनिल महाराज, तुषार पाटील,सिताराम कोळी यांनी मदत कार्य केले. यानंतर पोलिसांना प्रकार कळविल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मयत परेशच्या पश्च्यात वडील, आई, एक बहीण असा परिवार आहे.