घराची साफसफाई न केल्यामुळे
चिंचवड : बाहेरगावी जायचे असल्याने आईने मुलीला घर साफ करण्यास सांगितले. परंतु, मुलीने साफसफाई न केल्याने आई रागावली. त्यामुळे आठवीच्या वर्गात शिकणार्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी येथे घडली. शेजल दोरास्वामी मुदलियार (वय 14, रा. राधाकृष्ण मंदिरा जवळ, नढेनगर काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
शेजल आठवीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी शेजलला तिच्या आईने घरातील साफ सफाई करायला सांगितली होती. मात्र शेजलने काही काम केेले नाही. त्यामुळे शेजलला आई रागावली होती. तो राग मनात ठेवून शुक्रवारी आई आणि वडील कामावर गेले असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजलचे आई आणि वडील दोघेही तिला फोन करत होते. शेजल फोन उचलत नव्हती. त्यामुळे शेजारी राहणार्या व्यक्तीला फोन करून याची माहिती दिली. शेजारी राहणारा व्यक्ती शेजलाल सांगण्यासाठी घरी गेला पण दरवाजा बंद होता. त्यावेळी त्या व्यक्तीने खिडकी मधून डोकावून पाहिले असता शेजलने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची आई आणि वडिलांना देण्यात आले. ते आल्यानंतर शेजलला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.