आई रागावल्याने भुसावळात विद्यार्थिनीची आत्महत्या

भुसावळात पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

भुसावळ : शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंट रहिवासी व साकेगावातील मूळ रहिवासी असलेल्या अर्पणा सोपान पाटील (16) या दहावीतील विद्यार्थिनीने धान्यात टाकण्याचे औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आई रागावल्याने अल्पवयीन तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंटमधील रहिवासी अर्पणा पाटील ही गुरूकूल शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती मात्र मंगळवारी आईने रागावल्यानंतर तिने धान्यात टाकाण्याची औषधाची पावडर पाण्यात मिसळून हे पाणी प्राशन केले व अत्यवस्थ अवस्थेत भुसावळातील डॉ.मानवतकर हॉस्पीटलला उपचारासाठी नेल्यानंतर मध्यरात्री 1.45 वाजता उपचार सुरू असताना तिचा मृत्यू ओढवला.

ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदन
मृत अर्पणाच्या मृतदेहावर भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये बुधवारी सकाळी विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट पुढील तपास करीत आहे. मृत अर्पणा हिची आई डीआरएम कार्यालयात नोकरीला आहे तर वडील ठेकेदार आहे. दरम्यान, रुग्णालयात जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी जावून माहिती घेतली. अर्पणा ही पाटील यांच्या नात्यात आहे.