आई वडिलांच्या स्मृतीदिनी निंभेार्‍याच्या तायडे कुटुंबाची अनोखी समाजसेवा

0

मोफत मोतीबिंदू शिबिर ; 20 रुग्णांना लाभली दृष्टी

निंभोरा- आई-वडिलांच्या स्मरणार्थ 20 गरजू गरीब रुग्णांना मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करीत नवी दृष्टी देण्याचे अनोखे समाज कार्य निंभोरा येथील स्टेशन परी सरातील तायडे कुटुंबाच्या वतीने करण्यात आले. निंभोरा येथील स्व.गणपत तायडे व सराबाई तायडे यांची मुलं भीमराव तायडे, गौतम तायडे व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नाना तायडे यांच्या वतीने गत वर्षाप्रमाणे यंदाही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. नेत्रतज्ञ डॉ.शैलेंद्र ब-हाटे व सामाजिक कार्यकर्ते डॉ.एस.डी.चौधरी यांनी तपासणी केली.

यांची शिबिरास उपस्थिती
अध्यक्षस्थानी सरपंच डिगंबर चौधरी होते. प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष कडू चौधरी, दुर्गादास पाटील, सुनील कोंडे, राजीव बोरसे, जगजीवन मोरे, छगन मोरे, गंभीर कोलंबे, शे.नुरोद्दीन, राहुल तायडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनील कोंडे यांनी दृष्टीचे महत्व सांगत इतर खर्चाला फाटा देत तायडे परीवाराच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. तंटामुक्ती अध्यक्ष कडू चौधरी यांनी तायडे परीवाराच्या दातृत्वाविषयी माहिती देत गोर-गरीबांच्या सेवेची खरी प्रबळ भावना यातून दिसत असल्याचे सांगितले. दुर्गादास पाटील यांनी आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक कार्य करण्यासारखा दुसरा आनंद नाही, असे सांगितले तर राजीव बोरसे यांनी तायडे परिवार व त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. डॉ.एस.डी.चौधरी यांनी तायडे कुटुंबाचे कौतुक करीत हीच खर्‍या अर्थाने असलेली समाजसेवा असल्याचे सांगितले.सरपंच डिगंबर चौधरी यांनी हे मोफत मोतीबिंदू शिबिर गोर-गरीबांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत हीच खरी आईवडिलांना श्रद्धांजली असल्याचे सांगितले. यावेळी निंभोरा गावासह पंच क्रोशीतून ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली तर रक्तदाब, मधुमेह यांच्याही तपासण्या मोफत करण्यात आल्या.सूत्रसंचालन राजीव बोरसे यांनी तर आभार ऋषिकेश तायडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयभीम वॉरीयर्स मित्र मंडळाने परीरश्रम घेतले.