आकाशवाणी चौकात दोन तरुणांमध्ये फ्रि स्टाईल

0

जळगाव । शहरातील आकावाणी केंद्राच्या गेट समोर काही कारणावरुन दोन तरुणांमध्ये फ्रि स्टाईल झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघ तरुणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील आकाशवाणी केंद्राच्या गेट समोर जॉन केवीन लवलीस (वय-30) रा. लक्ष्मीनगर व डॉमनिक केवीस लवलीस (वय-32) रा. यशवंत नगर या दोघांमध्ये आपसातील काही कारणावरुन भांडण झाले. भांडणाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने दोघांरी रस्त्यावर एकमेकांसोबत झोंबाझोंबी करीत शांततेचा भंग केला. त्यामुळे दोघ तरुणांविरुद्ध मनोज कोळी यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रविंद्र तायडे हे करीत आहे.