आकुर्डी : प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीच्या वीज तोडणीची कामे अतिशय बेजबाबदारपणे बसविण्यात आलेली रोहित्रे व इतर संबंधित वीज उपक्रमांविषयी माहिती मिळण्याबाबत विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्याकरिता अर्ज केला होता. पण माहिती मिळालीही ती अपूर्ण देण्यात आली. माहिती अधिकार कायद्याचा गोपनीयतेचा भंग करुन विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांची माहिती तत्सम व्यक्तीला देणा-या आकुर्डी उपविभागीय कार्यालयातील अमित पाटील यांच्यावर त्वरीत कारवाई महावितरण यांनी करावी, अशी मागणी विद्युत वितरण समितीने राहूल कोल्हटकर यांनी केली.
गोपनीय माहिती उघड करण्याचे काम
शासकीय कार्यालयात माहिती अधिकार या कायद्याला बगल देण्याचे किंवा अर्जदाराची दिशाभूल करण्याची, चुकीची माहिती देण्याचे अर्ज व अर्जदाराची गोपनीय माहिती उघड करण्याचे काम शासकीय अधिकारी यांच्याकडून होत आहे. याचा प्रत्यय महावितरण भोसरी विभागीय कार्यालय व आकुर्डी उपविभागीय कार्यालय व विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांना आला आहे. संबंधित इमारतीच्या वीज जोडणीची कामे बेजबाबदारपणे केलेल्या चुकीच्या कामाबाबत व गैरकारभाराबाबत मुख्यमंत्री, उर्जामंत्री, व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांना तक्रार केल्यानंतर संबंधीत झालेले चुकीचे काम काढून टाकम्या आले, जे काही भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे पुरावे दिसत होते. ते नष्ट करण्यात आले. या प्रकारावरुन महावितरण कंपनी व संबंधित ठेकेदार आस्थापन यांनी केलेला गैरव्यवहाराचे पुरावे दिसत होते ते नष्ट करण्यात आले. गैरव्यवहार लपविण्यासाठी उप कार्यकारी अभियंता व माहिती अधिकारी कवडे तसेच कनिष्ठ अभियंता अमित पाटील धाब्यावर बसवत आहेत. तसेच चुकीची व दिशाभूल करणारी माहिती अधिकार कायद्याची खूप मोठी उदासिनता म्हणावी लागेल.