आक्षेपार्ह पोस्टने वरणगावात तणाव

0
भुसावळ:- एका समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तालुक्यातील वरणगाव येथे सायंकाळी तणाव पसरला. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍या सागर कुंभरकर (22) या संशयीतास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहा.निरीक्षक जगदीश परदेशी म्हणाले. शहरातील तणावाच्या वातावरणानंतर भुसावळसह परीसरातील पोलीस धावून आले.