आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने एकाविरुध्द गुन्हा दाखल

0

यावल । शहरातील एकाने एका समुदायाची धार्मिक भावना दुखावतील अशी पोस्ट सोशल नेटवर्कवर टाकल्याने शनीवारी सांयकाळी पोलिस ठाण्यात संबधीतावर गुन्हा दाखल करावा या मागणी करीता शेकडोेच्या संख्येत तरूणांचा जमाव एकत्र झाला होता. घटनेचे गांर्भिय लक्षात घेता एका विरूध्द आयटी अ‍ॅक्ट खाली गुन्हा नोंदवण्यात आला तर कायदा व सुव्यवस्थेच्या दुष्टीनेे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारींनी पोलिस ठाण्यात भेट दिली व जमावाला शांत केले. शहरातीलच रहिवासी एका तरूणाने एका समुदायाची धार्मिक भावना दुखावतील अशा आशयाची पोस्ट सोशल नेटवर्क फेसबुकवर टाकली सदरील पोस्ट टाकल्याने काही तरूणांनी त्यास ती काढून टाकावी त्यामुळे धार्मिक भावना दुखावतील अशी समज दिली मात्र, तरी देखील त्या तरूणाने ती पोस्ट कायम ठेवल्याने शनिवारी एका समुदायाचे शेकडो तरूण एकत्र येत पोलिस ठाण्यात दाखल झाले.

पोलिस निरिक्षक डी.के.परदेशी यांनी या समुदायाचा समज काढत संबधीतावर गुन्हा नोंदवू असे सांगीतले. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता फैजपूर उपविभागाचे प्रभारी उपअधिक्षक सुभाष नेवे यावलला दाखल झाले जमावाला त्यांनी शांत केले. रात्री उशीरा पर्यंत संबधीतावर आयटी अ‍ॅक्ट खाली गुन्हा नोंदवण्याचे कार्य सुरू होते गावात शांतता रहावी म्हणुन लवकरच शांतता समितीची बैठक घेतले जाईल संबधीतावर योग्य करवाई केली जाईल असे आश्वासन डीवायएसपी संतोष नेवे यांनी दिले सद्या गावात शांतता आहे.