जळगाव– ईच्छोदेवी मंदिरामागील पंचशिल नगरात लागलेल्या आगीत संसार उध्वस्त झालेल्या छायाबाई बोदडे, शेख जुबेर, संगीता जाधव, गौतम सुरवाडे, बेबाबाई सुरवाडे, गंगाराम साठे यांना आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १० वाजता धनादेश वाटप करण्यात आला़ यावेळी नायब तहसिलदार शितल सावळे, तलाठी बाविस्कर, अशोक लाडवंजारी, विनोद मराठे, दीपक सपकाळे, लता वैराट आदी उपस्थित होते़ दरम्यान, घटनेच्या दुसºया दिवशी आमदार भोळे यांच्याकडून जीवनाश्यक वस्तुंचे आग्रस्तांना वाटप करण्यात आले होते़ .