कर्जत । कर्जत तालुका आगरी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा हुतात्मा हिराजी पाटील सभागृह नेरळ येथे रविवारी पार पडली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आगरी समाजातील कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली तर आगरी समाज संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रथमतः आगरी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच सल्लागार सावळाराम जाधव आणि ईतिहासकार वसंत कोळंबे यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सभेचे सुत्रसंचलन श्यालिक जामघरे सर यांनी केले. मागील सभेचा इति वृत्तांत तसेच जमाखर्च, संचालक सुनिल रसाळ यांनी सभागृहाला सादर केला. संतोष जामघरे यांनी वधूवर मेळाव्याची संकल्पना समजावून सांगून त्यासाठी लागनारे छापिल फॉर्म पदाधिकारी मंडळाकडे सोपवले.
अनेकांनी केले मार्गदर्शन
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी विनाकारण दाखल झाली आहे. या संदर्भात समाज बांधवांना माहीती दिली. सावळाराम जाधव यांनी आपल्या भाषणात विविध विषयांवर आपले अनुभवी मत मांडले. एका दिवसात हळद आणि लग्न या विषयावर त्यांनी व्यक्त केलेल्या मताला ऊपस्थित असलेल्या समाज बांधवांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला. संघटनेचे अध्यक्ष एकनाथ धुळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, अनेक वक्त्यांनी केलेल्या भाषणाचा आपल्या संयमी, आक्रमक आणि वैचारीक पद्धतीने मार्गदर्शन केले. तसेच भवारे गुरुजी, अरुण ऐनकर, भानुदास गायकवाड, सुदर्शन कोळंबे, प्रविण माळी, नामदेव बदे, शिवराम बदे, संतोष भोईर, सुदामजी पेमारे, वसंत काका कोळंबे, आगरी समाज सेवा व्हॉटसअॅप गृपचे अॅडमिन विलास कोळंबे, संतोष जामघरे, सचिन मते आदी अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर ऊपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आगरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.