पुणे: उदाहरणार्थ नेमाडे यांच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांचा अरण्य हा आगामी चित्रपट येत आहे. दरम्यान अरण्य या सिनेमाचे युरोपातल्या हंगेरी येथे होत असलेल्या सेव्हन हिल्स आंतरराष्ट्रीय या चित्रपट महोत्सवात अरण्य चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
जगभरातून 3000 सिनेमे आले त्यातून फक्त 20सिनेमाची निवड झाली. त्यात अरण्यचा समावेश झाल्याने दिग्दर्शक अक्षय इंडीकरवर कौतुकाचा व अभिनंदन वर्षाव होत आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्यामुळे या आगामी चित्रपटाची घोषणा कधी करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.