The government has decided: the upcoming local government elections will now be based on the old ward structure ! मुंबई : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नवीन वॉर्ड रचना केली मात्र राज्यात शिंदे सरकार येताच हा निर्णय फिरवण्यात आला व आता याबाबतचे विधेयक बुधवारी विधानसभेत आज संमेत करण्यात आले त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या जुन्या वॉर्ड रचनेनुसारच होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
सरकार बदलताच निर्णय फिरवला
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नवीन वॉर्ड रचना केली तर नगरपालिका, नगरपरीषदा, नगरपंचायती आणि महापालिकांचा समावेश होता. यात 2011 च्या लोकसंख्येनुसार तर 2021 मधील संभाव्य लोकसभावाढीनुसार वॉर्ड रचना करण्यात आली मात्र मोठी राजकीय उलाढालीनंतर राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला व बुधवारी हेच विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले.
चुकीच्या पद्धत्तीने वॉर्डरचना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, चुकीच्या पध्दतीने ही वॉर्ड रचना करण्यात आली होती. यामुळे आता आधीनुसारच म्हणजे 2017 सालच्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका होतील..