जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील ; जोगलखेड्यात शेतकर्यांना बियाण्यांचे वाटप
भुसावळ- तीन राज्यातील सत्ताधारी भाजपाला घरी बसवून मतदारांनी भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली असून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही हुकुमशहा मोदी सरकार घरी बसणार असल्याचा विश्वास जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी व्यक्त केला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताहानिमित्त तालुक्यातील जोगलखेडा येथे शेतकर्यांना बी-बियाण्यांचे वाटप तसेच चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आला. प्रसंगी पाटील बोलत होते.
साध्या पद्धत्तीने सुप्रीमोंचा वाढदिवस साजरा
रवींद्र पाटील म्हणाले की, राज्यातील भीषण दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेता साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुक्याच्या वतीने कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता वाढदिवस शेतकर्यांसाठी साजरा केला जात आहे. प्रसंगी जोगलखेडा ग्रामपंचाय कार्यालय ध्वजारोहण करण्यात आले तसेच लहान बालकांच्या हातून केक कापण्यात आला व दुष्काळाच्या परीस्थितीची जाण ठेवून शेतकर्यांना चार्याचे तसेच बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा युवक तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, सरपंच पंकज पाटील, उपसरपंच रामसिंग मोरे, ग्रामपंचायत सदस्य जानकीराम कोळी, बाळू पाटील, छोटू पाटील, सुरेश पाटील, एकनाथ पाटील, युवक जिल्हा संघटक मंगेश पाटील, सागर पाटील व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.