जळगाव । जळगावकडून महापालिकेची आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 4 एप्रिल रोजी प्रभाग रचनेसाठी सोडत काढण्यात आली. जळगाव शहर महानगरपालिकेची 19 सप्टेंबर 2018 ला मुदत संपणार आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश महानगरपालिकेला पत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 37 प्रभाग तयार करण्यात आले होते. त्यात 36 प्रभागांमध्ये दोन नगरसेवक तर एका प्रभागांत तीन नगरसेवक अशी रचना तयार केली होती. आता आगामी निवडणुकीसाठी एका प्रभागात चार सदस्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता 19 प्रभाग असणार आहेत. प्रारूप आराखडा हा झीकझॅक (नागमोडी)पध्दतीने तयार करण्यात आला आहे.
महापालिका निवडणूक 2018 प्रभागनिहाय आरक्षण…
कार्यकक्षेची व्याप्ती वाढल्याने प्रचार अवघड
जळगाव महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांचे लक्ष लागून राहिलेली प्रभाग रचना आज पालिका प्रशासननाने जाहीर केली. तसेच या प्रभागातील आरक्षण सोडतही यावेळी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय विध्यार्थ्यांच्या हस्ते सोडत पार पडली. या निवडणुकीत प्रशासनाकडून चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करण्यात आला आहे. ज्यामध्ये चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. तर शेवटच्या प्रभाग क्र. 19 मध्ये 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात लोकसंख्येच्या विभागणीनुसार अंदाजे 23 ते 25 हजार मतदारांचा समावेश असल्याने संभाव्या उमेदवारांना प्रचारांसाठी नियोजन करणे अवघड ठरणार आहे.
अशी आहे आरक्षणाची वर्गवारी
या आधी दोन वॉर्डांचा एक प्रभाग होता. ज्यामध्ये दोन नगरसेवक निवडले जात होते. मात्र यंदा चार वॉर्डांचा एक प्रभाग यामुळे उमेदवारांची मोठी दमछाक होणार आहे. तर प्रभागरचने बरोबर यावेळी आरक्षण सोडत पार पडली. ज्यामध्ये अनुसूचित जाती – 2 , अनुसूचित जाती महिला – 3, अनुसूचित जमाती महिला -2 , अनुसूचित जमाती-2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महीला)- 10, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – 10, सर्वसाधारण महिला – 23 आणि सर्वसाधारण पुरुष – 23 असे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर झाले. तर एकूण आरक्षण मध्ये महिलांना 38 स्वंतत्र प्रवर्ग घोषीत करण्यात आले.
झालेली प्रभागरचना भाजपाच्या दृष्टीने हिताची-मनपा सार्वनिक निवडणूक प्रारुप प्रभागरचना आरक्षण सोडत अतिशय नियमाप्रमाणे व सुरळीत पार पडली. भाजपाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. काहि भाजपाच्या नगरसेवकांची सोडतीबद्ल नाराजी असली तरी प्रभागरचना प्रक्रिया सुरळीत घेण्यात आली आहे.
– भाजपा गटनेता सुनिल माळी
बसुन आराखडा बनविणारे चोर कोण?
मनपा सार्वत्रिक निवडणूक 2018 ची प्रारुप प्रभाग रचना आरक्षण सोडत प्रकिया मनपाच्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावर घेण्यात आली यावेळी विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनात उपस्थित नगसेविका ज्योती चव्हाण यांनी झालेल्या प्रभागरचना आरक्षण सोडतीबद्दल आक्षेप घेत शहरातील वार्डरचनेचे आरक्षण बसुन त्या चार लोकांनी केले आहे असा अरोप चव्हाण यांनी केला. आहे. त्यात अधिकारी चंद्रकांत खोसे यांचे हे नाव घेतले आहे. त्यामुळे आपल्या सोयीनुसार त्यांनी प्रभागाची रचना केली असून 29 जुन्या वार्डाचे तीन तुकडे करण्यात आले. त्यामुळे सोडत प्रक्रियेवर भाजपाचे काही नगरसेवक सोडले तर राहीलेले सर्व व्यक्तीगत हरकती घेणार आहेत.
-ज्योती चव्हाण
प्रभाग क्रमांक – 1
अ- अनुसूचित जाती (महिला)
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला
क- सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 2
अ-अनुसूचित जमाती (महिला )
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
क-सर्वसाधारण (महीला)
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 3
अ-अनुसूचित जाती (महिला )
ब- अनुसूचित जमाती
क-नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 4
अ-अनुसूचित जाती
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला
क-सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 5
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 6
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 7
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 8
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब-सर्वसाधारण महीला
क- सर्वसाधारण महीला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 9
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 10
अ-अनुसूचित जाती
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 11
अ-अनुसूचित जमाती
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 12
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 13
अ-अनुसूचित जाती महिला
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 14
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला
ब- सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 15
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब-सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 16
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब- सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 17
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब- सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 18
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब-सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 19
अ-अनुसूचित जमाती महिला
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
क-सर्वसाधारण महिला