पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मागच्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामती असेल. बारामतीमध्ये कमळ फुलवू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आयोजित पुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीची जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.