नंदुरबार। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे आमची उमेदवारी निश्चित आहे असा दावा करत आम्ही आता पासूनच तयारीला लागलो आहे, तसा प्रचार देखील सुरू केला आहे असे स्पष्टीकरण खासदर हिना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
खासदार हिना गावीत व आमदार डॉ.विजय कुमार गावीत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा राजकिय गोटात सुरु आहे. त्याचा खुलासा करतांना डॉ.विजयकुमार गावीत, खासदार हिना गावीत यांनी आम्ही कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. गेल्या दीड वर्षात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट वगळता कोणत्याही राजकीय नेत्यांशी चर्चा झाली नाही. लोकसभेसाठी नंदुरबार मतदारसंघातुन पुन्हा खासदार हिना गावीत यांना तिकीट दिले जाईल, हे निश्चित असल्याने आम्ही त्यादृष्टीने प्रचार देखील सुरू केला आहे असे यावेळी सांगण्यात आले.