पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे : भाजपाची वाटचाल आरएसएसच्या ईशार्यावर
भुसावळ- 2019 मध्ये होणार्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पीआरपी स्वबळावर लढणार आहे. राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या किती जागा लढवाव्यात? यासाठी चर्चा व नियोजन सुरू आहे. जागांची माहिती कोअर कमेटीसमोर ठेवली जाईल व यानंतर कोअर कमेटी अंतीम निर्णय घेईल. या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याची माहिती पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, आरएसएसच्या इशार्यावर चालणार्या भाजपकडून देशभरात जातीय उन्मात जाणीवपूर्वक केला जात अआहे.
17 ऑक्टोंबरला नागपूरला मेळावा
प्रा.कवाडे म्हणाले की, 37 वर्षांपासून धम्मचक्र दिनाच्या पार्श्वभुमीवर पीआरपी पक्षातर्फे भिमसैनिकांचा राष्ट्रीय मेळावा होता. यंदाही 17 ऑक्टोंबरला नागपूर येथे हा मेळावा होणार आहे. यात काश्मिरपासून केरळपर्यंत तब्बल 70 हजार भिमसैनिक येतील. आगामी 2019 ची निवडणूक अंत्यत महत्वाची निवडणूक आहे. देशात आरएसएसने भाजपच्या माध्यमातून जाणीवपूर्वक जातीय उन्मात सुरू केला असून देशभरातील वातावरण अस्थिर व दूषित झाले आहे. वाशिम, नंदूरबार, अकोला, धुळे आदी ठिकाणी जिल्हा परीषद निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
भीमा-कोरेगाव हा सरकार पुरस्कृत हल्ला
भीमा-कोरेगाव हा सरकार पुरस्कृत हल्ला असून याची पोलिसांनी चौकशी ही केलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आला त्याला बौध्द कार्यकर्त्यांनी विरोध केला तर गुन्हे दाखल करण्यात आले. शेतकर्यांनी सरकारला साथ दिल्यास सातबारा कोरा करू, कर्ज माफी करू, स्वामिनाथन आयोग लागू करू असे आश्वासन देण्यात आले मात्र एकाही आश्वासनाची आज पूर्ती नाही. ब्राम्हणांनी भोपाळला यज्ञ केला त्यात त्यांनी आरक्षण स्वाहः केले असा व्हिडिओ कवाडे यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
यांची होती उपस्थिती
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोळे, पीआरपीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते जगन सोनवणे, स्विकृत नगरसेविका पुष्पा सोनवणे, पश्चिम महाराष्ट्राचे भाईकांत सोनवणे आदी उपस्थित होते.