आगामी सण ,उत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील 10 गुन्हेगारांना तडीपार

0

नंदुरबार: आगामी सण ,उत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील 10 गुन्हेगारांना तडीपार करण्याची धडक कारवाई पोलिस अधीक्षक डॉ, संजय पाटील यांनी केली आहे, व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणे,दादागिरी दाखवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या, त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ, संजय पाटील यांनी ही कारवाई केली आहे, तडीपार केलेल्यांमध्ये वीरेंद्र जामसिंग अहिरे,गौतम मंगलसिंग खैरनार हे व यांच्या टोळीतील गोविंद यशवंत सामुद्रे,गोपी यशवंत सामुद्रे,प्रकाश काशिनाथ गावीत,दशरथ सुका भिल,आकाश कृष्णा गावीत,विजय देविदास सामुद्रे,आशिष विजय ठाकूर, राहुल नामदेव ऊर्फ दीपक पेंढारकर यांचा समावेश आहे, या दहा ही जणांना नंदुरबार जिल्ह्यातुन तसेच गुजरात राज्यातील निझर कुकुरमुंडा येथून हद्दपार करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे सुझलोंन मधून तार चोरी करणाऱ्या टोळीतील देखील काही जणांना तडीपार करण्याची कारवाई केली जाणार आहे,अशी माहीत पोलिस अधीक्षक डॉ, संजय पाटील यांनी दिली.