आग्रहासाठी समर्थक शिवाजीनगरात

0

जळगाव। यापुढे विधानसभा निवडणूक लढविणार नाही, या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विधानाचे जिल्ह्यात पडसाद उमटले . त्यानी लोकसभा, राज्यसभा, विधानपरिषदेचे पर्याय खुले ठेवले असले तरीही विधानसभा निवडणूक न लढविण्याची भूमिका बदलावी, या मागणीसाठी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व समर्थकांनी शिवाजीनगरातील या त्यांच्या निवासस्थानी भेटून साकडे घातले.

मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही, असे बोललो, मात्र राजकीय संन्यासाविषयी बोललो नाही. नजिकच्या काळात कोणतीही निवडणूक नसल्याने समाजकारण व राजकारण सुरूच राहणार असल्याची स्पष्टोक्ती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली. लोकसभा निवडणुकीला 2 वर्ष तर विधानसभा निवडणुकीला अडीच वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे आता त्याबाबत विचार करणे घाईचे ठरेल. राजकीय संन्यास, भाजपाच्या वाटेवर अशा चर्चेविषयी सुरेशदादा जैन म्हणाले की, माङया विधानाचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे. ‘मी शिवसेनेत आहे. पक्ष बदलाचा विचार नाही. या चचार्ंचा मीदेखील आनंद घेत आहे. असे ते म्हणाले. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात हिच चर्चा सुरु आहे.