आग लागल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लांबविला मोबाईल

0

जळगाव। जयकिसनवाडीतील नवजीवन मंगल कार्यालयासमोरील जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली होती. या दरम्यान आग विझविण्यासाठी चौधरी यांच्या घरातून आग विझविण्यासाठी नागरिक ये-जा करत असतांनाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील दिवाणावर ठेवलेला 9 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयकिसनवाडीत सोमवारी 22 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास विनायक सुतार व आनंद राणा यांच्या जुन्या लाकडी इमारतीला आग लागली होती. आग भीषण असल्यामुळे परिसरातील नागरिकांची तसेच अग्निशमन दलाची आग विझविण्यासाठी धडपळ सुरू होती. त्या दरम्यान, आग लागलेल्या इमारतीच्या शेजारीच राहणार्‍या रोहिणी प्रकाश चौधरी ह्या देखील आग कशी लागली हे पाण्यासाठी घराबाहेर आल्या. परंतू आगीचे लोळ उठत असल्यामुळे तसेच आग विझविण्यासाठी गल्लीतील लोक रोहिणी चोैधरी यांच्या घरातून ये-जा करीत होते. या दरम्यान, रोहिणी चौधरी यांनी त्यांच्या घरातील दिवाणावर ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आल्यानंतर रोहिणी चौधरी या घरात मोबाईल घेण्यासाठी गेले असता त्यांना मोबाईल मिळून आला नाही. यानंतर त्यांनी दुसर्‍या मोबाईलवरून त्या मोबाईलच्या क्रमांकावर फोन लावल्यानंतर तो बंद दाखवित होता. त्यामुळे त्यांना मोबाईल चोरी झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी आज बुधवारी रोहिणी प्रकाश चौधरी यांच्या फिर्यादीवरून 9 हजार रुपये किंमतीचा मोटो कंपीनीचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पूढील तपास बळीराम तायडे हे करीत आहेत.