आघाडीतील असंतुष्टांनाच हवाय मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

0

पुणे । राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांमध्ये अद्यापही उद्धव ठाकरे यांना स्थान मिळालेले नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची राळ उडवली जात असताना भाजपचाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचे प्लानिंग आहे, उगीच आम्हाला कशाला बोट लावता? असा आरोप त्यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येत्या 27 मे पूर्वी विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे तर लॉकडाऊमुळे विधान परिषद निवडणूक पुढे ढकल्यात आली आहे. यावर तोडगा म्हणून राज्य मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांची राज्यपाल सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे वाद पेटला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीने राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे, त्यात आम्ही का पुढाकार घ्यावा? आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचे प्लानिंग आहे. उगीच आम्हाला कशाला बोट लावता? असा प्रश्‍नही त्यांनी केला.