तळेगाव दाभाडे । आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 206 व्या जयंतीनिमित्त तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने येथील योगीराज सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दुर्मिळ साहित्याचे प्रदर्शन आणि बाळशास्त्री जांभेकरांचे वंशज यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवारी होणार आहे. याचे अध्यक्षस्थान माजी आमदार कृष्णराव भेगडे भूषविणार आहेत. आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर हभप डॉ. रामचंद्र देखणे यांचे साहित्य आणि पत्रकारीता या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण या वृत्तपत्राचे सुरुवातीचे विशेष अंक, लेख आणि त्यांचे वृत्तपत्रीय क्षेत्रातील दुर्मिळ साहित्य याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे संयोजन करणारे रामनाथ पंडित यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील वाळूंज यांनी सांगितले. या कार्याक्रमाचे संयोजन तळेगाव शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव अतुल पवार, संयोजक सुरेश साखवळकर, बी.एम. भसे, एस. एन. गोपाळे, तात्यासाहेब धांडे, श्रीकांत चेपे आदींनी केले आहे.