आचेगावच्या तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

0

भुसावळ- तालुक्यातील आचेगाव येथील 20 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली आमहत्या केल्याची घटना 6 रोजी दुपारी दीड वाजेपूर्वी आचेगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली. गणेश लक्ष्मण सरोदे (20, आचेगाव, ता.भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या का केली ? याबाबत कारण कळू शकले नाही. वरणगाव स्टेशन प्रबंधक यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.