जळगाव । राजकरणात हेही करावे लागते तेही करावे लागते, मात्र आता काळ बदलला असून एकनाथराव खडसे, तुमच्या शेजारी बसले आहे. आजचा गौरव हा आपल्या कार्याचा, विकासाचा गौरव आहे. आज दोन तोफांची उपस्थिती आहे. एक विरोधी पक्षाची व एक सत्ताधारी पक्षाची, मात्र आज काल विधानसभेत सत्ताधारी तोफाही जोरात आहे, नक्की मनात काय आहे, काय माहीत, शेवटी हे राजकारण आहे. अशी काहीशी फटकेबाजी आपल्या मनोगतातुन माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी केली. आजचा गौरव हा विकासाचा गौरव असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यांनी यावेळी केले. आजच्या राजकारणात जिल्ह्यात सर्व गोष्टी एकत्रिरित्या संभाळून घेणारा एकमेव नेता, म्हणजे आमदार सतीश अण्णा असेही अरूणभाई गुजराथी यावेळी म्हणाले.
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आगमन
दरम्यान गौरव सोहळ्यात राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आगमन झाले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षय आमदार डॉ. सतीश पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. आज नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अजित पवार आहे. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची या सोहळ्याला उपस्थिती विशेष लक्षणीय आहे. अजित पवार व एकनाथराव खडसे एकाच व्यासपीठावर एकत्रित आले आहे. दरम्यान, अजित पवारांनी एकदातरी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा प्रास्ताविकात गौरव समितीचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली.