आजची गुंतवणूक ही भविष्याची तरतूद -प्रा.व्ही.डी.पाटील

0

पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात ‘सामाजिक शास्त्रातील नवप्रवाह’ सप्ताहाचा समारोप

भुसावळ- गुंतवणूक करणे व्यक्तीपरत्वे भिन्न संकल्पना असून आजची गुंतवणूक ही भविष्याची तरतूद आहे त्यासाठी आपण किती, केव्हा आणि कशी गुंतवणूक करावी याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. शिक्षण ही आजची गुंतवणूक असून आपण ज्या विषयांचे ज्ञान घेतो त्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. गुंतवणूक ही पैशाच्याच स्वरूपाची असते, असे नाही तर संगणकाचे ज्ञान, तंत्रज्ञानाचे ज्ञान, गणिताचे ज्ञान इ.प्रत्येक क्षेत्राचे कौशल्य असले पाहिजे, असे विचार अर्थशास्त्र विभागातील सेवानिवृत्त ज्येष्ठ प्रा.व्ही.डी.पाटील यांनी येथे व्यक्त केले. कला, विज्ञान आणि पु.ओ.नहाटा वाणिज्य महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभागांतर्गत 8 ते 14 जानेवारी दरम्यान ‘सामाजिक शास्त्रातील नवप्रवाह’ विषयावर आधारीत सप्ताहप्रसंगी ते बोलत होते.

भाववाढीचा विचार करून करा बचत
प्रा.व्ही.डी.पाटील म्हणाले की, मी किती वर्ष जगणार आहे, माझ्या उत्पन्नाचे मार्ग कोणते?मी किती वर्ष काम करू शकतो? याचे नियोजन करून सेवानिवृत्तीनंतर आत्मसन्मानाने जीवन जगायचे असेल तर भाववाढीचा दर लक्षात घेऊन साधारणपणे आपल्या उत्पन्नाच्या 35 टक्के बचत केली पाहिजे. गुंतवणूक ही शेती, जमीन, सोने या क्षेत्रात फारशी न करता भाग बाजार (शेअर्स), म्युॅच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करा, गुंतवणूक ही माहितीच्या आधारावर करा, ती खूप मोठा परतावा मिळवून देईल, असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एम.व्ही.वायकोळे होत्या. समन्वयक डॉ.ए.डी.गोस्वामी, सहसमन्वयक प्रा.प्रफुल्ल इंगोले, अर्थशास्त्र विभागतील प्रा.एस.टी.धूम, प्रा.व्ही.ए.साळुंके उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
सूत्रसंचालन प्रा.व्ही.ए.साळुंके तर प्रास्ताविक प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी तर मनोगत विद्यार्थी अदनान अहमद व आरती भागात यांनी व्यक्त केले. आभार प्रा. प्रफुल्ल इंगोले यांनी मानले. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी सामाजिक शास्त्र विभागातील प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.डी.एम.टेकाडे, प्रा.जे.पी.अडोकार, प्रा.दीपक शिरसाठ, डॉ.जे.एफ. पाटील यांनी परीश्रम घेतले.