नवी दिल्ली – ब्रिटिश भारतात आले तेव्हा देशात जवळपास ९९४ प्रकारची सोने आणि चांदीची नाणी चलनात होती. पण, ईस्ट इंडिया कंपनीने १९ ऑगस्ट १७५७ मध्ये कोलकाता येथे पहिला रुपया टाकसाळीत टाकला. कंपनीद्वारे बनवण्यात आलेल्या पहिले नाणे बंगालच्या मुगल प्रांतात चालवण्यात आले होते.
बंगालच्या नवाबासोबत झालेल्या एका करारांतर्गत ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ मध्ये ही टंकसाळ स्थापन केली होती. त्यानंतर पैसा, आणा, रुपया ही ब्रिटिशांची नाणी चलनात आली.
१७५७ मध्ये प्लासीच्या युद्धानंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्य स्थापन केले. तेव्हा कंपनीला बिहार आणि बंगालमध्ये कमाई करण्याचा अधिकार देण्यात आला होता. ईस्ट इंडिया कंपनीने उभारलेली टंकसाळ ही जुन्या किल्ल्यातील ब्लॅक होलच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये होती. १७५७ पासून १७९१ पर्यंत ती येथेच होती.