आजपासून जळगावात अ‍ॅथेलेटीक्स चॅम्पियनशीप स्पर्धा

0

जळगाव : रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडीया आरपीएफ अ‍ॅथेलेटीक्स चॅम्पियनशीपचे आयोजन जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये करण्यात आले आहे. जळगाव येथे आज २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय रेल्वेतील एकूण १७ क्षेत्रीय कार्यालयांमधून ३५० ते ४०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा ऑल इंडीया अ‍ॅथेलेटीक पोलिस मीटमध्ये निवड करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते १०.३० दरम्यान उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.