नवी दिल्ली-सर्वाधिक चर्चेचा आणि वादग्रस्त रियलिटी शो बिग बॉस पुन्हा एकदा टिव्हीवर येत आहे. यंदा येणारा बिग बॉसचा १२ वा सीजन असणार आहे. आजपासून याचे प्रसारण होणार आहे. मागील आठवड्यात १२ सीजनमधील कलाकारांची यादी जाहीर झाली होती. अभिनेता सलमान खान बिग बॉसला जज करणार आहे.
यांचा आहे सहभाग
यंदाच्या बिग बॉसमधील सर्वाधिक महागडी जोडी पोर्नस्टार डैनी डी आणि माहिका शर्मा यांची आहे. दर आठवड्याला ९५ लाख रुपये या जोडीला मिळणार आहे. कॉमेडियन भारती आणि त्यांचे पती हर्ष लिमब्यिया या शोमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना दर आठवड्याला 50 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नेहा पेंडसे
मराठमोळी अभिनेत्री टीवी शो ‘मे आई कम इन मैडम’ फेम नेहा पेंडसे ह्या देखील बिग बॉस सीजन 12 व्याचा हिस्सा होणार आहेत
दीपिका कक्कर
चर्चित सीरियल ‘ससुराल सिमर का’ मधील सिमर म्हणजे दीपिका कक्करने आपल्या अभिनयाच्या बळावर बिग बॉसमध्ये स्थान मिळविले आहे. ती १४ ते १६ लाख रुपये दर आठवड्याला घेणार आहे.
शलीन भनोत
सध्या चर्चेत असलेला वादग्रस्त अभिनेता शालीन भनोत हिला बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळणार आहे. एक्स पत्नी दलजीत कौर सोबत झालेलया वादामुळे तो सध्या चर्चेत आहे.
समीर पसरीचा
पम्मी आंटी म्हणून प्रसिद्ध असलेले नामांकित अभिनेता पसरीचा यांना देखील बिग बॉसचा घरात स्थान मिळाले आहे. समीर ससुराल सिमर का या सीरिअल आणि कॉमेडी नाइट्स बचाओ 2 चा भाग राहिला आहे.
सृष्टि रोडे
‘इश्कबाज’ शो ची कलाकार सृष्टि रोडे पण बिग बॉसचा हिस्सा बनणार आहे. सृष्टि तिचा बॉयफ्रेंड मनीष नागदेव सोबत सहभाग घेऊ शकते.
अनूप जलोटा
‘ऐसी लागी लगन भजन से पॉपुलर हुए’ या गाण्याचे गायक अनूप जलोटा यांचे बिग बॉसमधील स्थान निश्चित झाले आहे. अनूप जलोटा जवळपास 65 वर्षाचे आहे.
श्रीसंत
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि आईपीएल 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेले श्रीसंत हे देखील बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘खतरों के खिलाड़ी सीजन 9’ मध्ये श्रीसंत दिसून आले होते.
स्कारलेट
‘स्प्लिट्सविला’ फेम स्कारलेट एम रोज हीला देखील बिग बॉसमध्ये स्थान मिळाले आहे. नेहमी हॉट और सेक्सी लुकमुळे ती चर्चेत असते. ती बॉय फ्रेंड पीटरसनसोबत प्रवेश घेणार आहे.
राजीव सेन
अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ दिग्गज मॉडल राजीव सेन बिग बॉसच्या 12 व्या सीजन मध्ये सहभागी होणार आहे.
जसलीन मथारू
युवा सिंगर जसलीन मथारू हिला सुद्धा बिग बॉसमध्ये स्थान मिळाले आहे.