यवतमाळ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी यवतमाळमध्ये आज ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दुपारी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. तर संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरणा ढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान साहित्य संमेलनाच्या नियोजीत कार्यक्रमाला सुरुवात झाले आहे. सकाळी ग्रंथदिंडीची सुरुवात झाली आहे.
मराठी साहित्य संमेलन यंदा देखील नेहमीप्रमाणे वादात सापडला आहे. सुरुवातीला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध इंग्रजी साहित्य लेखिका नयनतारा सहगल यांची निवड करण्यात आली होती. मात्र, निमंत्रण पत्रिका वाटप केल्यानंतर सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याने मोठा वाद उफाळला. यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला.