आजपासून रंगणार आशियाई स्पर्धेचा थरार !

0

जकार्ता –आजपासून १८ व्या आशियाई स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आज रात्री जकार्ताच्या गिलोरा बंग कर्नो या स्टेडियमवर या स्पर्धेचा दिमाखदार उद्धाटन सोहळा पार पडणार आहे. इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांग येथे या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान या स्पर्था होणार आहेत.

या वर्षीच्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. १८ व्या आशियाई स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असणार आहे. हा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५:३० वाजता होणार आहे.

या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध इंडोनेशियन नृत्यदिगदर्शक डेन्नी मलिक व एको सुप्रियांटो यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४ हजार नर्तक येथे आपली कला सादर करतील. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंडोनेशियन संगीतकार एडी एमस रोनाल्ड स्टीव्हन हे आपल्या शंभरपेक्षाही जास्त वाद्यवृंदच्या तालावर उत्साही आणि रोमांचक सादरीकरण करतील. यावेळी स्पर्धेत सहभागी ४५ देशांच्या संघाची परेड सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. यावेळी भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करेल.