पिंपरी- चिंचवडमध्ये कर्करोगाला कंटाळून एका इसमाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी पिंपरीमध्ये घडली. इंद्रजित रुपचंद्र पवार (वय ५८) असे या व्यक्तीचे नाव आहे.
इंद्रजित पवार यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाने ग्रासले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. मात्र त्यांनी बुधवारी राहत्या घरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.