जामनेर। तालूक्यातील केकतनिंभोरा येथील रहिवाशी सुभाष ओंकार हिवरे वय 55 यांने आजाराला कंटाळून राहत्या घरातील लाकडी सर्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 23 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मयत सुभाष हिवरे हा मोल मजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालवित होता. तो गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्यामुळे त्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याच सांगितले जात आहे. मयतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून मयतचा भाऊ देवराम ओंकार हिवरे याच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ.विलास महाजन करीत आहे. हिवरेच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी ,सुन , जावाई, नातू असा परीवार आहे.