आजाराला कंटाळून 64 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Hands bowed before long illness : 64-year-old man from Navi committed suicide by hanging himself यावल : तालुक्यातील न्हावी गावातील 64 वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळुन आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जयंत काशीराम फिरके (64) असे मयताचे नाव आहे.

दुर्धर आजाराने कंटाळून आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून फिरके हे दुर्धर आजाराने त्रस्त होते व सोमवारी ते घरी एकटेच असताना त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार दुपारी दोन वाजेच्या सुमारास निदर्शनास आल्यानंतर तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात वडील, पत्नी, मुली असा परीवार आहे.