नवी दिल्ली-आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे १ जानेवारीला निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज कॅनडातील ले मिडॉवेल दफनभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून कादर खान यांची प्रकृती गंभीर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
विनोदी अभिनेता अशी ओळख मिळवताना त्यांनी स्वत:ची अशी खास शैली निर्माण केली होती. पण त्याचबरोर ते उत्तम संवादलेखनही करायचे. अभिताभ बच्चन, गोविंदा यांच्या कारकीर्दीस लेखक म्हणून त्यांनी आकार दिला. शराबी, लावारिस, मुक्कदर का सिकंदर नसीब अग्निपथ यांसारख्या बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं. तर गोविंदासोबतची त्यांची जोडीही विशेष गाजली. नंतरच्या काळात ते मुलासह कॅनडात गेले.