आज कामकाजाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ

0

मुंबई-आज शेयर बाजार किरकोळ अंकांच्या वाढीसह सुरु झाले. बीएसईच्या ३१ कंपनीचे शेयर सेन्सेक्स १८.११ अंकानी वाढले त्यामुळे सेन्सेक्स ३५ हजार ४९२.६२ अंकावर सुरु झाले. निफ्टी देखील १४.७५ अंकांनी किरकोळ वाढ होऊन १० हजार ६७०.९५ वर पोहोचले.

काल मंगळवारी सेन्सेक्स ३००.३७ अंकांनी खाली जाऊन ३५ हजार ४७४.५१ वर बंद झाले होते. निफ्टी देखील १०७.२० अंकांनी खाली येऊन १० हजार ६५६.२० वर बंद झाले होते.