जळगाव। स्वामी विवेकानंद बहुद्देशिय मंडळ तसेच युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे 21 मे रोजी दहशतवादविरोधी दिनानिमित्त नागरी शक्ती मुक रॅली काढण्यात येणार आहे. शनिपेठेतली महर्षी दधिची चौकातून सकाळी 9.30 वाजता रॅलीला सुरूवात होईल. रॅलीत सहभागी नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, स्वयंसेवी संघटना व संस्थांचे सदस्य काळ्या फिती लावून दहशतवादाला निषेध नोंदवतील.
शहीद, पोलिस, नागरिकांना वाहणार श्रद्धांजली
खान्देश मॉल प्रांगणात रॅलीचे रूपांतर संकल्पसभेत होईल. दहशतवादाच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन करण्यात येईल. देशभरात विविध शहरातून झालेल्या दहशतवादी व नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा ठरलेल्या सैनिकांना, शहीद झालेल्या पोलिसांना तसेच नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. उपस्थित मान्यवर मनोगत व्यक्त करतील दहशतवादविरोधी शपथ व प्रतिज्ञाग्रहण करण्यात येईल. राष्ट्रगीताने या संकल्पसभेचा समारोप होईल. दहशतवादी संघटनांकडून देशाला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर रा.स्व. संघसंचलित राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या मार्गदर्शनाने तसेच प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे तसेच युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांनी कळविले आहे. शासकीय तसेच निमशासकीय व स्वायत्त संस्था आस्थापनांतील सदस्यांनीही रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन कैलास सोनवणे व विराज कावडीया, अमित जगताप यांनी केले आहे.