धुळे: येथील विशेष न्यायालयात सुरु असलेल्या जळगाव घरकुल प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे सर्व संशयित आरोपी न्यायलयात हजर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. न्यायालय आवारात १० पोलीस अधिकारी, ७४ पोलीस कर्मचारी, आरसीपीचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. जळगाव घरकुल घोटाळ्याचे काम पाहणाऱ्या जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग 1 सृष्टी निळकंठ या हजर नाहीत त्यामुळे आता जिल्हा न्यायाधीश वर्ग-2 एस.आर.उगले धुळे यांच्याकडे कामकाज होणार आहे. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
न्यायालय आवारात समर्थकांची मोठी गर्दी असून न्यायालय न्यायदान कक्षाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांच्या साक्षी आणि आवश्यक ते पुरावे तपासण्याचे काम पूर्ण झाले आहे. संशयित आरोपी यांच्या संदर्भातील युक्तिवाद आणि प्रतिवाद देखील पूर्ण झाले आहे. यापूर्वी 21 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान संशयितांची हजेरी घेण्यात आली होती. गैरहजर असणार्या चार संशयिताविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारांत बजावले होते. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीला सर्वच संशयित उपस्थित राहतील.
Prev Post