जळगाव : पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यासाठी जवाहर नवोद्य परिक्षा घेण्यात येत आहे. सदरील परिक्षा आज रविवारी 8 रोजी ही आयोजित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील 29 केंद्रावर परिक्षा घेतली जाणार असून शहरातील दोन केंद्रावर परिक्षा होणार आहे. ला.ना.हायस्कूल आणि ए.टी.झांबरे विद्यालय या शहरातील दोन केंद्रावर परिक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील 10 हजार 727 विद्यार्थी नवोद्य परिक्षा देणार आहे. परिक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्याचे वर्ग 6 ते 10 चे शिक्षण नवोद्य विद्यालय होणार आहे. केंद्र संचालक, सीएलओ, यांची केंद्रावर परिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहनियंत्रक म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि साकेगाव नवोद्य विद्यालयाचे प्राचार्य काम बघणार आहे. विद्यार्थ्याना प्रवेशपत्र देण्याचे काम गटशिक्षणाधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर वायकोळे हे परिक्षेचे कामकाज बघत आहे. परिक्षेसाठी पर्यवेक्षक, लिपीक, शिपाई यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.