आज ठरणार आशिया चषकाचा विश्वविजेता

0

दुबई : आतापर्यंत आशिया चषकात एकही सामना न हरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा आज अंतिम सामना बांगलादेशशी होणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजेपासून सामना सुरु होणार आहे. बांगलादेश संघाने ३७ धावांनी पाकिस्तानला पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. सातव्यांदा विक्रमी भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. बांगलादेशलाही यावेळी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची आशा आहे.

भारत-बांगलादेश यांच्यातील चुरस जुनीच आहे. तथापि फायनलपूर्वी प्रमुख खेळाडूंचे जखमी होणे बांगलादेशसाठी निराशादायी आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया चषक जिंकणे भारतासाठी मात्र मोठे यश ठरेल.

अंतिम सामान्यातील प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडु, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल आणि दीपक चाहर.

बांगलादेश : मशरफी मूर्तझा (कर्णधार), मोहम्मद मिथून, लिट्टन कुमार दास, मुशफिकूर रहीम, अरुफूल हक, महमुदुल्लाह, मोसद्देक हुसेन, नजमूल हुसैन शानो, मेहदी हसन मिराज, नजमूल इस्लाम अपू, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान, अबू हैदर रोनी, सौम्या सरकार, मोमिनूल हक, इमुरूल कायेस.