आज देशभरातील ३३८ रेल्वे गाड्या रद्द !

0

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने तांत्रिक कारणामुळे आज तब्बल ३३८ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. ज्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यात पॅसेंजरचा अधिक समावेश आहे. काही मेल, एक्सप्रेस, विशेष रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. देशभरात सुरु असलेल्या रेल्वे रुळाच्या डागडुजीचे काम तसेच इतर कामगिरीसाठी ह्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ज्या गाड्या रद्द आहेत. त्यांची नावे रेल्वेने वेबसाईटवर जाहीर केले आहे.

रेल्वे स्थानकावर घोषणा करून देखील रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांची माहिती दिली जात आहे.