आज नोटबंदीविरोधात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

0

जळगाव : ‘ना मै खाऊंगा न किसी को खाने दूंगा’ असे पंतप्रधान मोदी म्हणतात परंतु, नोटाबंदींच्या काळात सर्वात जास्त पैसे भाजपा आमदार, मंत्री तसेच भाजपा पक्षांच्या कार्यकर्त्यांकडेच सापडल्याचा असा आरोप केला. तसेच या नोटाबंदींच्या निर्णयाविरोधात शुक्रवार 6 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी मनोज रोठोड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. या वेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे, माजी खासदार उल्हास पाटील, डॉ. राधेशाम चौधरी, उदय पाटील, प्रभाकर सोनवणे, अजबराव पाटील, शाम तायडे, अमजदखान पठाण, उल्हास साबळे आदी उपस्थित होते.

9 जानेवारी रोजी महिलांचा थाळीनाद आंदोलन
राठोड यांनी मोदींवर टीका करताना सांगितले की, आजही 90 टक्के एटीएम बंद आहेत. नागरिकांनी 500 एक हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या. मात्र, सरकारने तेवढ्या प्रमाणात नवीन नोटा छापल्या नासल्याचा राठोड यांनी स्पष्ट केले. तसेच नोटाबंदींच्या निर्णयानंतर मध्यमवर्गीय व गरीब नागरिक बँकांच्या रांगेत आहेत. नोटबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांत शेतमाल रस्त्यावर फेकून द्यावा लागला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली आहे. जानेवारी ते 31 मार्चदरम्यान काँग्रेसतर्फे विविध आंदोलन केली जाणार आहे. शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी काँग्रेस आंदोलन करणार असून याअंतर्गत 6 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.