आज मध्यप्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी; २५ मंत्र्यांचा समावेश

0

भोपाळ-राजस्थाननंतर आज मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळात २५ मंत्र्यांचा समावेश आहे. आज नवनियुक्त आमदार शपथ घेणार आहे. दुपारी तीन वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल नवनियुक्त मंत्र्यांना शपथ देणार आहे.

मध्यप्रदेशमध्ये मंत्रिमंडळ स्थापनेवरून दीर्घ चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री कमलनाथ मंत्रिमंडळातील आमदारांच्या नावाची यादी घेऊन दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.