जळगाव। जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच असून, रविवारी एकाच दिवशी शहरासह तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात या मोकाट कुत्र्यांनी आठ जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले असून या जखमींवर सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले. महापालिका मात्र, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत उदासीन असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरासह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना दिवसांगणिक वाढत आहेत. कुत्र्यांचा चावा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात आठ जणांवर उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वेदांत रायसिंग पाटील (वय 06 रा. मन्यारखेडा), नामदेव शांताराम साळुंखे (वय 47 रा. कांचननगर), मायादेवी देवानंद कटारिया (वय 60 रा. सिंधी कॉलनी), इंद्र विरासणी (वय 53 रा.सिंधी कॉलनी), मेहमुद खान गनी खान (वय 52 रा. गेंदालालमिल), राजेश जैन (वय 43 रा. रिंगरोड), वासुदेव रामकृष्ण फुसे (वय 31 रा. शिरसोली), आमीर शेख (वय 17 रा. मारोतीपेठ) यांचा समावेश आहे. दरम्यान, या मोकाट कुत्र्यांचा महानगरपालिकेने बंदोबस्त लावाला अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शहरात डॉगव्हॅन फिरवण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.